Ahilyanagar: तमाशा मंडळातील कलाकारांना बेदम मारहाण, महिलांनाही सोडलं नाही; VIDEO व्हायरल

Tamasha artists beaten in Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांना मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपींनी महिला कलाकारांनाही देखील सोडले नाही. या मारहाणीत अनेक जण जखमी झालेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला कलाकारांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार भागात ही घटना घडली. वाहनाला कट मारल्याचा आरोप करत ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. तमाशा मंडळातील कलाकार मारहाणीत जखमी झाले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी इतर लोकांना बोलावून मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांचे कपडे देखील फाडण्यात आले. विठाबाई यांचे पुत्र महेश नारायणगावकर यांना देखील मारहाण केल्याचा आरोप आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com