VIDEO: विशाळगडावर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा, खासदार Shahu Maharaj यांचं पोलीसांना पत्र
विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्ताने झालेल्या हिंसाचार प्रकरणी कारवाई करण्याची मागणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे. विशाळगडावर जाऊन उद्या पाहणी करणार असल्याचं शाहू महाराज यांनी सांगितलं आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शाहूमहाराजांनी पोलीसांना पत्र दिलं आहे. कुठच्याही समाजघटकावर अन्याय नाही झाला पाहिजे, जर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असल्याचंही शाहू महाराज म्हणाले. विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमिताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राज्यसरकारने रविवारी अतिक्रमण काढण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश या पूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती असं म्हणत हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शाहू महाराज यांनी पत्राद्वारे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.