Supreme Court Big Decision: मुस्लिम महिलांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 'पोटगी'मिळणार!

Muslim Women News: सुप्रीम कोर्टाने मुस्लिम महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.घटस्फोटानंतरही महिलांना आता पोटगी मिळणार आहे.

मुस्लिम महिला घटस्फोटानंतर आपल्या पतीकडून पोटगी घेऊ शकणार आहे.सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.CrPC च्या कलम 125 नुसार मुस्लिम महिलांना पोटगी मिळू शकणार आहे.न्यायमूर्ती बी.व्ही. न्यायमूर्ती नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.दरम्यान कलम 125 हा सर्व विवाहित महिलांना लागू होणार असल्याचं खंडपीठाने सांगितले आहे.

CrPC च्या कलम 125 काय सांगतो?

जर एखादी महिला तिच्या उदरनिर्वाहासाठी पती किंवा मुलांवर अवलंबून असेल,तिच्याकडे दुसरे कोणतेही साधन नसेल तर महिला पोटगीचा दावा करु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com