Shivsena : शिवसेना नाव आणि चिन्हाची सुनावणी लांबणीवर

Maharashtra Politics : 17 सप्टेंबरला होणारी शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी आता 21 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी 21 ऑक्टोबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी याआधी 17 सप्टेंबरला होणार होती. पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आता 21 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. याआधी देखील ही सुनावणी 2 आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर टाकली गेली आहे. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सुनावण्या सातत्याने लांबणीवर टाकल्या जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com