VIDEO : अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतली कठोर भूमिका

Sunil Tatkare on Jan sanman Yatra Bjp Protest : पुण्यातील जुन्नर येथे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कठोर भूमिका घेत, महायुतीतील नेत्यांना सवाल केला आहे.

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सुद्धा याविषयी महायुतीतील घटक पक्षांना सवाल करत कठोर भुमिका घेतली आहे.

अनेक जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री आहेत. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विविध जिल्ह्यात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात. त्यावेळी महायुतीतील इतर घटक पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत. मग पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला डावलतात. असा आक्षेप कशासाठी? भाजपच्या नेत्या आशा बुचकेंच्या या टीकेला उत्तर देण्याची मला तरी काही गरज वाटत नाही. मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री नावाचा उल्लेख केला जात नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. महायुतीत कोणताही दुरावा निर्माण झालेला नाही. अस म्हणत तटकरेंनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com