Sunil Shelke : सुनील शेळके घाबरला असा अर्थ घेऊ नका, मावळच्या सभेत स्फोटक भाषण | VIDEO

Sunil Shelke : स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण एकत्रित लढणार असल्याचे सुनील शेळके यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह माहितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी झालं गेलं गंगेला वाहून आपण महायुतीचा धर्म पाळून येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढू. पण सुनील शेळके घाबरला असा अर्थ घेऊ नका. येणाऱ्या नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण एकत्रित लढू असा विश्वास आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिला. मावळच्या वडगाव येथे महायुतीचा आभार मेळावा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह माहितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या, दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली, ती विचारांची नव्हती, ती व्यक्तिगत वादातील निवडणूक होती. देवेंद्र फडवणीस यांनी ज्यावेळेस उल्लेख केला त्यानंतर काही लोक आपल्यासोबत आले आणि महायुतीचा धर्म पाळून कामाला लागले. मात्र काही लोक तर माझ्या कुटुंबापर्यंत आले जे माझ्या रक्त मासाची नाही ती रस्त्यावर उतरले. जे वडीलधारी असतील महायुतीतील कार्यकर्ते पदाधिकारी असतील, त्यांच्या कुटुंबावरती आले, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, ही खंत आहे.

निवडणुका पण लढू, या पण कशा पद्धतीने लढले पाहिजे आपल्याला पण जनतेने मावळस नेतृत्व करण्याची संधी दिली होती. व्यक्तिगत द्वेषापोटी राजकारण करतील तर हे मावळच्या संस्कृतीला शोभत नाही. असं भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना आमदार शेळके यांनी टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com