Sunetra Pawar News: मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी अर्ज भरणार!

राज्यसभेसाठी दादा गटाकडून आज सुनेत्रा अजित पवार यांचा अर्ज भरला जाणार असल्याची माहिती आहे.

Sunetra pawar News: राज्यसभेसाठी दादा गटाकडून आज सुनेत्रा अजित पवार यांचा अर्ज भरला जाणार असल्याची माहिती आहे. लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणारेत. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवारांचा अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. 60 वर्षीय सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. बारामतीमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते. राजकारणात येण्यापूर्वी समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी होत्या. 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com