Sujay Vikhe Patil : विधानसभा लढवण्याबद्दल सुजय विखेंचं मोठं विधान

Sangamner News : अहमदनगरमधून लोकसभेसाठी पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढवण्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगरमधून लोकसभेसाठी पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची ईच्छा सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखे यांना विधानसभेत तिकीट मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

पक्षाने आदेश दिला आणि संगमनेर मतदारसंघाची जागा भाजपला सुटली, तर मला विधानसभा निवडणूक लढवायला आवडेल असं सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटल आहे. तर त्यांच्या या ईच्छेवर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे. ''याबद्दल बोलावं असं काहीही नाही. आपल्याकडे लोकशाही आहे. विखे यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी खुशाल लढावी.' असं बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com