Elections : राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरावर दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

Pimpri Chinchwad Elections: पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका कुदळे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Pimpari Chinchwad NCP : पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रियांका कुदळे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान महिलांना शिवीगाळ करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेनंतर प्रियांका कुदळे यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. Stone pelting at NCP candidate Priyanka Kudale house in Pimpri

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत. भाजप ही निवडणूक स्वबळावर लढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com