VIDEO : राज्य मंत्रीमंडळाची बैठक रद्द; मोठं कारण आलं समोर
आज होणारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक रद्द होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची तब्बेत बरी नसल्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
म्हाडाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री ऑनलाइन उपस्थित राहणार होते. मात्र तेथे देखील त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आज शिंदे यांचा सोलापूर दौरा देखील होता. त्यानंतर संध्याकाळी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार होती. मात्र हे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांच्या तब्बेतीच कारण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत खराब असल्याने आजचे सगळेच कार्यक्रम रद्द केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.