Video: आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक

आज एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवर दुपारी उदय सामंत यांच्याकडे व्यवस्थापनाची बैठक पार पडणारे.

ST Employee Protest: महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये दीर्घ आंदोलन केले होते. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण पुरते ठप्प झाले. सलग ५४ दिवस सुरू असलेला संप मागे २० डिसेंबर २०२१ रोजी मागे घेतला होता. त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, असा आरोप करत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संपाची हाक पुकारली आहे. आता ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार आहेत. त्यावेळी लालपरी ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी 9 ऑगस्टपासून संपाची हाक दिलीये. आज एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांवर दुपारी उदय सामंत यांच्याकडे व्यवस्थापनाची बैठक पार पडणारे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com