Special Report : Jayant Patil : जयंत पाटलांचा विशाल आणि विश्वजीत कदमांना इशारा?

सांगली लोकसभेतील विजयानंतर नुतून खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदार संघाकडे मोर्चा वळवत, थेट त्यांच्याच बालेकिल्ल्यातून त्यांना आव्हान दिले आहे.

Special Report : Jayant Patil : सांगली लोकसभेतील विजयानंतर नुतून खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदार संघाकडे मोर्चा वळवत, थेट त्यांच्याच बालेकिल्ल्यातून त्यांना आव्हान दिले आहे. विशाल व विश्वजित यांच्या आव्हानानंतर जयंत पाटील समर्थक चांगलेचे आक्रमक झालेत, त्यांनी सोशल मिडियावर जयंत पाटील यांच्या आवाजातील एक रील व्हायरल केले आहे. ज्यामधे जयंत पाटलांच्या एका भाषणाची क्लिप असून यामध्ये जयंत पाटील गोड बोलतात पण जयंत पाटलांचा अजून तुम्ही विरोध बघितला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळेचं गमावाल एवढेच सांगतो असं भाषण असलेला रील बनवत तो व्हायरल करण्यात आलाय. यामुळे जयंत पाटलांच्या समर्थकांकडून  रिल्सच्या माध्यमातून विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष इशारा देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com