Nashik News: पर्यटनासाठी आकर्षण ठरतोय नाशिकचा सोमेश्वर धबधबा पाहा VIDEO

Someshwar waterfall tourist footfall: नाशिकमध्ये संततधार पावसामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळतेय. गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे धबधबा रौद्र रूप धारण करत असून निसर्गप्रेमींसाठी आकर्षक ठरत आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा गेल्या ८ दिवसांपासून प्रवाहित झालाय त्यामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होतेय. मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाने थैमान घातले असून गोदावरी नदीला पुर आला आहे.

तसेच नाशिकमध्ये 24 दिवसांत दुप्पट पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणेही गतवर्षीपेक्षा 41 टक्के अधिक भरली आहेत. पावसाने काहीशा विश्रांतीनंतर रात्रीपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे गंगापुर धरणातून आता 1760 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नाशिक येथील असलेल्या सोमेश्वर धबधबाने रौद्ररूप धारण केले आहे. याच ठिकाणी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com