दुचाकीत घुसला साप, बाहेर काढताना फुटला घाम; पाहा VIDEO

Snake Trapped Under Scooty:अकोला शहरातील गजानन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ७ फूटाचा साप स्कुटीच्या सीटखाली सापडला. सर्पमित्रांच्या मदतीने तीन तासाच्या प्रयत्नानंतर सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
Summary

अकोला शहरात गजानन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये स्कुटीमध्ये ७ फूटाचा साप आढळला.

साप बिनविषारी असून तात्काळ सर्पमित्रांच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आला.

सापाला बाहेर काढण्यासाठी ३ तास लागले, काही स्कुटी पार्ट्स उघडावे लागले.

पावसाळ्यात साप मानवाच्या वस्तीत येऊ शकतो, त्यामुळे दुचाकीस्वारांनी विशेष खबरदारी घ्यावी.

अकोला शहरातल्या मोठी उमरी भागातील गजानन आपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कुटीमध्ये 7 फुटाचा साप निघालाय. स्कुटीच्या बसण्याच्या शिट्स खाली हा जाऊन बसला होता. महिला पार्किंगमधून स्कुटी काढताना मागच्या चाकावर त्यांना सापाची शेपटी दिसली, त्यांनी डोकावून पाहिल असता मोठा साप दिसलाय. त्या घाबरल्या, पुढं तातडीने सर्पमित्रांना फोन केला, आणि दोन तासाच्या रेस्क्यूनंतर या सापाला स्कुटीमधून बाहेर काढण्यात आलं.

हा साप स्कुटीच्या आत जाऊन बसला होता, त्यामुळे सर्पमित्रांना रेस्क्यू करताना मोठी अडचण आली होती. सापाला रेस्क्यू करताना स्कुटीचे काही शिट्सचे पार्ट देखील उघडावे लागले होते. सर्प मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 फुटाचा हा साप होता, बिनविषारी असल्यामुळे जास्त धोका नव्हता. मात्र, ऐन पावसाळा सुरू आहे, अन्नाच्या शोधार्थ साप हा मानवी वस्तीत शिरतो, त्यामुळे दुचाकीस्वारांनी सकाळी दुचाकी बाहेर काढताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com