Lok Sabha गट नेते पदी Shrikant Shinde यांची निवड, Shiv Sena संसदीय समितीच्या बैठकीत निर्णय

लोकसभेत शिवसेनेच्या गटनेतेपदी श्रीकांत शिंदे यांची निवड झाली आहे. श्रीरंग बारणे यांनी शिंदे यांचे नाव सुचवले.

शिवसेना लोकसभा गटनेतेपदी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड झाली आहे. संसदीय समिती सदस्य खासदार श्रीरंग बारणे यांनी डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिले. शिवसेना संसदीय समितीची बैठक संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व शिवसेना खासदारांनी एकमताने गट नेते पदी खासदार डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड केली. लोकसभेत सभापती यांची निवड झाल्यानंतर शिवसेना लोकसभा गटनेते पदाची अधिकृत निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com