अबब! ३ घरं, कार, कोट्यवधींची मालमत्ता, भिकाऱ्याकडील संपत्तीचा आकडा वाचून डोळे पांढरेफट्ट पडतील

crorepati beggar case mangilal indore : भिकारी म्हणून ज्याला रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक एक रुपया, दहा रुपयांपर्यंत भीक द्यायचे तो कुबेर निघाला. इंदूरचा भिकारी कुबेर असल्याचं भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेतून उघड झालंय. त्याच्याकडची संपत्ती बघून कॉमन मॅनचेही डोळे पांढरेफट्ट पडतील.

इंदूरमधील भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराफा परिसरात भीक मागणाऱ्या मांगीलाल नावाच्या भिकाऱ्याकडे तीन घरं, तीन रिक्षा, एक कार आणि कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे उघड झाले. अपंगत्वामुळे शासकीय घर मिळालेलं असतानाही तो व्याजाने पैसे देण्याचा अवैध व्यवसाय करायचा. प्रशासनाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाने भिक्षावृत्तीच्या मागे चालणाऱ्या गुन्हेगारी नेटवर्कवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सराफा बाजाराच्या गल्लीबोळात लाकडाची पांगुळगाडी, पाठीवर बॅग आणि हातात चपलांच्या मदतीनं सहानुभूती मिळवणारा मांगीलाल रोज पाचशे ते हजार रुपयांची कमाई करायचा. तोंडातनं अवाक्षरही न काढता तो रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या बाजूला जायचा. लोकांनाही त्याची दया यायची. ते स्वतःहून त्याला पैसे द्यायचे. पण हाच भिकारी कोट्यधीश निघाला. भीक मागून जे पैसे मिळायचे, ते तो सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांना व्याजावर द्यायचा. एक दिवस, एक आठवड्याच्या हिशेबानं तो व्याजावर पैसे द्यायचा. तसेच रोज पैसे वसुलीसाठी सराफा बाजारात यायचा. भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेत मांगीलाल अधिकाऱ्यांच्या हाती लागला. पण त्याच्याकडे चौकशी केली असता, तो कुबेर निघाला.

नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगीलालचे शहरातील वेगवेगळ्या भागांत तीन घरे आहेत. भगतसिंग नगरमध्ये त्याचं तीन मजली घर आहे. तर शिननगरमध्ये ६०० स्क्वेअर फूट घर, अलवासमध्ये १० बाय २० फुटांचा वन बीएचके फ्लॅट आहे. मांगीलालकडे तीन रिक्षा आहेत. ते भाडेतत्वावर चालवायला दिल्या आहेत. त्याच्याकडे कार आहे. ती चालवण्यासाठी ड्रायव्हर पगारावर ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com