Ambarnath News | अंबरनाथमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार!

आपली पनौती (पनवती -इडा पिडा ) दुसऱ्यावर टाकण्यासाठी, अंधारात रस्त्याच्या मधोमध सुपामध्ये लिंबू दोरे आणि इतर वस्तू ठेवून दोन विकृत व्यक्ती ताबडतोब पसार झाल्याचे अंबरनाथ मधील शिवगंगा नगरमध्ये समोर आले आहे.

Ambarnath News | आपली पनौती (पनवती -इडा पिडा ) दुसऱ्यावर टाकण्यासाठी, अंधारात रस्त्याच्या मधोमध सुपामध्ये लिंबू दोरे आणि इतर वस्तू ठेवून दोन विकृत व्यक्ती ताबडतोब पसार झाल्याचे अंबरनाथ मधील शिवगंगा नगरमध्ये समोर आले आहे. सदर प्रकार पाहून तिथे नागरिक जमा होऊ लागले, तर काही घाबरून दूर पळू लागले. ते पाहून रस्त्यातील वाहनांनी, व्यक्तींनी आपले मार्ग बदलले. अंधश्रद्धेच्या विरुद्ध अंबरनाथ मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांची जनजागृती आणि निषेध व्यक्त करत अन्नघटकही असल्याने सुरसे यांनी स्वतः ते उचलून वाहत्या पाण्यात सोडून आले. या प्रकाराने शिवगंगा नगर मध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com