विरारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अचानक स्फोट झाला. या स्फोटात १० वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. विरारच्या पूर्वेकडील खैरपाडा येथे ही घटना घडली आहे.
खैरपाडा परिसरात रस्त्यालगत कचरा टाकण्यात येतो. त्यात रस्त्याजवळ काही मुले ही गोट्या खेळत होती. खेळता खेळता कचऱ्यात उडालेली गोटी शोधण्यासाठी दोन मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे गेली. त्यावेळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अचानक स्फोट झाला. यात दिलनाश अन्सारी हा मुलगा जखमी झाला आहे. मुलाच्या मानेला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.