Special Report: मिटिंगमध्ये नडला, अंगठा तोडला....
मुंबई दहिसरमध्ये एक भयांकर घटना घडली आहे. सोसायटी मिटींगमध्ये झालेला वाद एकाला खूप महागात पडला. या वादात या व्यक्तीने आपला चक्क अंगठाच गमावला आहे. नेमका हा प्रकार काय? तुम्ही जर सोसायटीच्या मिटिंगला जात असाल तर तुम्हाला वेळीच सावध करणारी ही महत्वाची बातमी आहे. सोसायटीच्या मिटिंगमध्ये वाद घालू नका. नाहीतर तुम्हालाही अंगठा गमवावा लागेल. हे आम्ही अशासाठी सांगतोय. कारण मुंबईत एका सोसायटीच्या बैठकीत असाच वाद विकोपाला गेला. सोसायटी मिटींगमध्ये हमरी-तुमरी होण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. मुंबईच्या दहिसरमधील अंबरनाथ सोसायटीची ही मिटींग होती. या मिटिंगमध्ये सदस्य आणि अध्यक्षांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अध्यक्षाने सभासदाच्या अंगठ्याचा लचकाच तोडला. नेमका काय आहे हा सगळा प्रकार, चला पाहूयात....
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.