Sanjay Raut News : एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री; संजय राऊत यांचा टोला

MP Sanjay Raut Criticized CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील त्यांच्या नावाची पाटी काढल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी याबद्दल टीका कली आहे.

एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य असले तरी मुख्यमंत्री आहेत. ते आता पुन्हा नव्याने निवडून आले आहेत. आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार मुख्यमंत्री होतील. पण आता ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नागपूरच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील त्यांच्या नावाची पाटी काढण्यावर त्यांनी ही टीका दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. तसंच महायुतीतून मुख्यमंत्री कोण होईल यावर देखील राजकीय खलबत होताना दिसत आहे. त्यातच आज नागपूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील त्यांच्या नावाची पाटी काहीवेळासाठी काढण्यात आली होती. त्यांनातर टी पुन्हा लावण्यात आली असली तरी यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत. याच संदर्भात खासदार संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेत टीका केली आहे. ही शासकीय प्रक्रिया आहे. घटनाबाह्य असले तरी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रला सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. जनतेला ही अपेक्षा नसली तरी आम्ही ही अपेक्षा ठेवली आहे. मुख्यमंत्री कोण आहे, हे शेवटी दिल्लीचे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचं ठरवतील, आमदार काय हा निर्णय घेणार नाही, असं टोला देखील यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com