संजय राऊत सरकारवर बरसले.
शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन.
आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात - राऊत
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं कहर माजवला आहे. अनेक जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं झोडपून काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रावर संकट कोसळलं आहे. सरकारने २४ तासात काम करायला हवं होतं. सरकार कुठे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले की, 'धाराशिवचे पालकमंत्री एकदा २ टेम्पो घेऊन गेले. फोटोंसह परतले. पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी ठाण मांडून बसणे आवश्यक असताना, ते मुंबईत काय करत आहेत? तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली? हे मला दाखवा. आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत, तुम्ही काय केले ते दाखवा..' असं राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.