Amit Thackrey : अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार; विधानसभेत करणार मदत?

Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे नेते अमित ठाकरे उतरले तर त्यांना मदत करण्याचा निर्णय शिंदेसेनेकडून घेण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी शिवसेना जागा सोडायला तयार आहे. जर मनसे नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर शिवसेना शिंदे गट त्यांच्यासाठी जागा सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यासाठी भांडुप मतदारसंघ सोडायला शिवसेना तयार झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे नेते अमित ठाकरे यांनी उतरावं असं मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी जर अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची ठरवली तर त्यांच्यासाठी भांडुप विधानसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने दाखली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नसला तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांना मदत करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com