VIDEO : आधी विमानातून आला AB फॉर्म, आता घेतली माघार; धनराज महालेंच्या माघारने झिरवळांना दिलासा
दिंडोरीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात महायुतीची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि धनराज महाले यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असल्याचं यावेळी नरहरी झिरवळ यांनी म्हंटलं आहे. धनराज महाले यांनी माघार घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांसह धनराज महाले यांचे आभार मानलेत. धनराज महाले निवडणुकीत मनापासून आपल्यासोबत काम करतील, असा विश्वास देखील झिरवळ व्यक्त केला आहे.
दिंडोरीच्या जागेसाठी महायुतीकडून शिंदे गट आणि अजित पवार गट इच्छुक होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. आज अखेर शिंदे गटाचे धनंजय महाले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता ही जागा अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास अगोदर धनराज महाले यांना विमानातून AB फॉर्म पाठवण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माघारीचे आदेश दिल्यावर काल संध्याकाळपासून धनराज महाले नॉट रीचेबल होते. काल संध्याकाळपासून नॉट रीचेबल असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले यांची अखेर माघार घेतली. सूचका मार्फत पत्र पाठवून धनराज महाले यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं कळवलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र धनराज महाले अद्यापही नॉट रीचेबलच असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.