Shivsena UBT Municipal Election 2025 : महापालिका निवडणुकांबाबत संजय राऊतांचं महत्वाचं विधान |VIDEO

Shivsena UBT Municipal Election 2025 : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अंतिम निर्णय घेणार असून सर्वांची नजर मुंबईवर आहे.

महापालिका निवडणुकांसंदर्भात खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महानगरपालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे, डोंबिवली-कल्याण, मीरा भाईंदर या महत्त्वाच्या पालिकांमध्ये निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे.

प्रभाग रचनेसंदर्भातील अडथळे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दूर झाले आहेत. महाविकास आघाडीसोबत युतीबाबत चर्चा सुरू असून काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा पर्यायही उघड आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना स्वातंत्र्य दिले असून मुंबईच्या निवडणुकींचा निर्णय संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com