Dasara melava 2024 News : यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? महत्वाची माहिती आली समोर

shivsena shinde group : शिंदे गटाचा दसरा मेळाव्याबाबत महत्वाची माहिती समोर आलीये. यंदा शिंदे गटाचा मेळावा बीकेसीतील मैदानात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार आहे. बीकेसीमधील मैदानाची जागा निश्चित झाल्याने शिंदे गटाने तयारी देखील सुरु केल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा तिसरा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी तब्बल ४० हजार शिवसैनिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी आझान मैदानात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पहिला दसरा मेळावा हा बीकेसी येथेच पार पडला होता. मात्र, आझान मैदानात जागेच अडचण, पार्किंगची अडचण लक्षात घेता पुन्हा एकदा बैकेसी मैदानात हा मेळावा होणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com