Video: शर्मिला ठाकरे यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

निर्भया हत्याकांडच्या वेळेस तो आरोपी 16 वर्षाचा असूनही त्याला सोडण्यात आलं होतं ती देखील मोठी चूक आहे.

"उरणचं प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात पोलिसांना आम्ही सूचना केल्या की अतिशय गंभीरतेने घेऊन कारवाई करण्यात यावी. ज्या विकृतपणे हा प्रकार सगळा झालेला आहे त्यामुळे असे विकृत आरोपी मग ते कुठल्याही वयाचे असतील त्यांना अजिबात सूट दिली जाऊ नये. निर्भया हत्याकांडच्या वेळेस तो आरोपी 16 वर्षाचा असूनही त्याला सोडण्यात आलं होतं ती देखील मोठी चूक आहे. शक्ती कायदा हा त्यावेळेस बनवण्यात आला होता मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पंतप्रधानांना आम्ही विनंती करतो की वर्षभरात या कायदाबाबत अंमलबजावणीसाठी करण्यात यावी. पुरुषाला धर्म नसतो. जर यशश्री प्रकरण धार्मिक मुद्द्यावर घेऊन जात असाल तर याच्या आधीच प्रकरण आणि बलात्कार हा मंदिरात झाला होता त्याच्यामुळे ते हिंदू आहेत म्हणून त्यांना सोडण्यात यावं आणि याच्यावर कारवाई करावी असा धार्मिक वळण याला लावू नये" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com