Video: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार उतरणार मैदानात

Mpsc Protest News: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार आता स्वत:चा मैदानात उतरणार आहेत. MPSC च्या विद्यार्थ्यांसंदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा शरद पवार स्वत: आंदोलन करणार असल्याचं पवारांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

एमपीएससीच्या पार्श्वभूमीवर काही पदं वाढविण्यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. शरद पवार हे आता एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी स्वत: मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. शरद पवारांनी ट्विटद्वारे सरकारला थेट इशाराच दिलाय. ट्विटमध्ये ते म्हणाले, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी जाऊन मी स्वत: आंदोलनाला बसणार , तसेच मी स्वत: आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com