Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

Sharad Pawar Warns Leaders: मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना जातीय सलोखा राखण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी तरुणांना मोठी संधी मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी पक्षांतर्गत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. बोलताना प्रेमाची भाषा वापरा, जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, असे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

ते म्हणाले, स्थानिक आणि राज्य पातळीवर बोलताना जातीवाचक भाषेचा वापर टाळा. सध्या काही नेते आणि मंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. तसेच पवार यांनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार संग्राम जगताप यांच्या अलीकडील वक्तव्यांवरही टीका केली. पूर्वी आपल्या पक्षात असलेले काही लोक आता जाती-जातीत तणाव निर्माण करणारी विधानं करत आहेत, हे चुकीचं आहे, असे ते म्हणाले.

तरुणांना मिळणार संधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जाहीर केले की, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल. जास्तीत जास्त तरुणांना कशा प्रकारे पुढे आणता येईल, यासाठी प्रयत्न करा, अशी पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com