VIDEO : 'इंदापूरला झालेला कार्यक्रम फलटणला घेऊ'; रामराजेंच्या पक्ष प्रवेशाचे पवारांचे संकेत

Sharad Pawar : 'इंदापूरला झालेला कार्यक्रम आता फलटणला घेऊ' असे वक्तव्य करून शरद पवार यांनी आज रामराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल संकेत दिले आहेत.

भाजपचा हर्षवर्धन पाटील यांच्या सारखा मोठा मोहरा आपल्या हाती घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी अजित पवार गटातील नाराज नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश सोहळा सोमवारी इंदापूरला पार पडला आहे. या सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. आता मी फलटणला जाणार असून इंदापूरला झालेला कार्यक्रम तिथे घेणार आहे, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला धक्का मानला जात आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, 'हर्षवर्धन मला बोलता बोलता म्हणाले की, आम्हाला काही काम द्या. पण काहीही काम करायला हर्षवर्धन कशाला हवा. कठीण काम, लोकांच्या जीवनमरणाचे काम असेल तर ते हर्षवर्धनला देऊ. तुम्हाला आता ते करावे लागेल. मला निवडणूक लढायची नाही. मला 14 वेळा निवडून दिले. मला आता स्वतःसाठी काही नको. तुम्ही आता हर्षवर्धन यांना विधानसभेत पाठवा, असं आवाहन शरद पवार यांनी उपस्थितांना केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com