Sharad Pawar Video: पिपाणी चिन्ह यादीतून वगळा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आयोगाला पत्र?

Sharad Pawar News Today: पिपाणी चिन्हांमुळे लोकसभेत काही प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीच्या गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिपाणी चिन्ही यादीतून वगळा, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे झालेल्या अडचणीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं, अशी मागणीही पवार गटाकडून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय न घेतल्यास शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं काय पाऊल उचलणार? याकडं आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com