Shahaji Bapu Patil : माझ्या नादाला लागू नको; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना खुलं आव्हान

Shahaji Bapu Patil Vs Sanjay Raut : शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना खुले आव्हान दिले आहे. माझ्या नादाला अजिबात लागू नको. कुठे अडवायचे तिथे अडवून दाखव, असं पाटील म्हणाले.

काय झाडी, काय डोंगर या डायलॉगनं अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि संजय राऊत यांच्यात जुंपली आहे. विधानसभेत काय, मुंबईत पण पाय ठेवून देणार नाही, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं होतं. त्या आव्हानाला शहाजीबापूंनी प्रतिआव्हान दिलं आहे. कुठं आडवायचं तिथं आडव, माझ्या नादाला लागू नको, असा थेट इशारा त्यांनी राऊतांना दिला आहे.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज मतदान केलं. मतदानानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सांगोला येथील मतदारांनी मला कधीच विजयी केलंय असं चित्र गेल्या महिनाभरापासूनच दिसत आहे. दोन वर्षांत मी जे विकासपर्व सुरू केलंय, त्यावर जनतेनं माझी पाठ थोपटली आहे. भरभरून प्रतिसाद देत आहेत. मी ही निवडणूक जिंकणारच, असा विश्वासही शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या ७० जागा जिंकून येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेतच काय तर मुंबईतही पाय ठेवू देणार नाही, असं संजय राऊत सांगोला येथे बोलले होते. त्यावर पाय ठेवायचं काय, मतदान सोडून आता सुद्धा येऊन दाखवतो. कुठे आडवायचे तिथे अडवून दाखव. माझ्या नादाला लागायचं नाही. काय बोलायचे आहे, ते संसदीय भाषेत बोलायचं. संजय राऊतांना एवढंच सांगतो की माझं मत घेऊन तुम्ही दिल्लीत गेला आहात. पण सांगोलातील मतदारांच्या जीवावर मी मुंबईत येणार आहे. २३ तारखेला गुलाल माझाच आहे, असा विश्वास देखील शहाजीबापूंनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com