VIDEO: NCCF च्या कांदा खरेदीत कोट्यावधींचा घोटाळा, शेतकरी संघटनांचा गंभीर आरोप

Onion News: NCCF च्या कांदा खरेदीत कोट्यावधींचा घोटाळा, ईडी आणि सीबीआय मार्फत कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी

दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. अशातच कांदा शेतकरी देखील आक्रमक झाल्याची बातमी समोर येत आहे. NCCF च्या कांदा खरेदीत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा शेतकरी संघटनांकडून आरोप केला जात आहे. कांदा खरेदीत दोन ते अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संघटनांकडून केला जात आहे. ईडी आणि सीबीआय मार्फत या संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. परंतु याच कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com