Kalyan News | खासदार श्रीकांत शिंदेंच्या संस्थेत घोटाळा? संजय राऊत यांचे PM Modi यांना पत्र
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ''खासदार श्रीकांत शिंदे'' फाऊंडेशनमध्ये 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी राऊतांनी केलीये. निवडणूक रोख्यांप्रमाणेच महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप राऊतांनी केलाय. कंत्राटाच्या बदल्यात फाउंडेशनमध्ये कोट्यवधींच्या रोख देणग्या घेतल्याचा राऊत यांचा आरोप आहे. काही लाख रुपयांसाठी विरोधकांवर कारवाई करणाऱ्या ईडी-सीबीआय या फाऊंडेशनवर कारवाई करणार का, असा सवाल राऊत यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.