VIDEO: Sassoon Hospital हे ड्र्ग्ज माफियांसाठी फाईव्ह स्टार, vijay wadettiwar यांचा आरोप

Sassoon Hospital News: ससून रुगणालयाचा वाद विधान सभेत पेटला, दोशींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

ससून रुगणालयाच्या मुद्यावरुन विधान सभेत आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ससून रुग्णालय हे ड्र्ग्ज माफियांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल बनलं असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर ससून हा गुन्हेगारीचा अड्डा आहे असा आरोप धंगेकर यांनी केला आहे. दोशिंना बढती का देता त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला आहे. तर काही घटनांमुळं ससून बदनाम झालं आहे, पण आता कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com