Pune Sassoon Hospital News: ससूनमध्ये रुग्णांची लूट? Video Viral

ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट सुरू आहे असा आरोप होत आहे. निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडे २४ हजार रुपये मागितल्या आरोप करण्यात आला आहे.

ससून हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे २४ हजार रुपये मागितल्या आरोप होत आहे. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणी ससून हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यात फेरफार केली होती. हा वाद शमत नाही तोवर ससून हॉस्पिटल पुन्हा वादाच्या फेऱ्यात अडकले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे मागण्याचे काही व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि खासगी मेडिकलवाले मिळून रुग्णांची लूट करत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com