Sasoon Hospital News : अखेर ससून हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरचे निलंबन, साम टीव्हीच्या बातमीचा दणका
ससून हॉस्पिटलचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाना निर्जन ठिकाणी सोडलं होतं. या प्रकरणी पुण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि आमदारांनी आवाज उठवला होता. आता या डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या डॉक्टरला हॉस्पिटलमधून निलंबीत करण्यात आले आहे. डॉ.आदिकुमार असे या डॉक्टरचे नाव आहे. हा डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन ठिकाणी सोडत होता. यासाठी एक रिक्षावालाही ठरवलेला होता जो हे काम ५०० रुपयांत करायचा. आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूसनचे डीनची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच या डॉक्टरला निलंबीत करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.