Pune Porsche Accident News | डॉ. तावरे पोलिसांकडूनच घ्यायचा चिरीमिरी, धक्कादायक खुलासे समोर

ससून हॉस्पिटलमधला डॉक्टर अजय तावरे पोलिसांकडूनच चिरीमिरी घ्यायचा अशी माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर अजय तावरे पोलिसांनाच हॉटेलचं बिल द्यायला लावायचा असेही कळाले आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी अटकेत असलेला डॉ. अजय तावरे पोलिसांकडूनच चिरीमिरी घ्यायचा. तावरे पोलिस केसममध्ये पोलिसांकडून १०० ते २०० रुपये घायचा. तावरे अनेकवेळेला पोलिसांनाच हॉटेलचं बिल भरायला सांगायचा असे तपासात समोर आले आहे. दरम्यान ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्याची कल्पना तावरेनेच दिली होती. यामुळे पुरावा राहणार नाही आणि ही केस वीक होईल असे तावरेने म्हटले होते. या कामासाठी तावरे आणि अगरवालमध्ये मोठी डील झाली होती का याचा तपास पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com