Ashadh Wari: नामस्मरणात रंगली माऊलींची पालखी; दिवे घाट पार करत सासवडमध्ये आगमन|पाहा ड्रोन सदृश्य

Sant Dnyaneshwar Maharaj’s Palkhi: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवे घाट पार करत सासवडमध्ये दाखल झाली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. डोंगर चढताना स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोडीने रथाला साथ दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आज नागमोडी आणि अवघड असलेला पुणे जिल्ह्यातील दिवे घाट लीलयापार केला. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत मुखी विठुरायाचा गजर आणि डोळ्यात पंढरपूरची आस घेऊन पालखी ने दिवे घाट सर केला. माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडी बरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बैल जोडी ने सुद्धा साथ देत हा अवघड घाट संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास ओलांडला. घाटात उपस्थित असलेल्या हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा अनुभवला. दिवे घाटातील पालखी सोहळ्याचे दृश्य ड्रोन ने देखील टिपले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com