Video: संजय राऊत यांचं मोठं विधान! म्हणाले, '2 महिन्यात आमची सत्ता येते, तेव्हा नारायण राणे तिहार जेलमध्ये...'

Sanjay Raut on Narayan Rane News: 'नारायण राणे यांच्यासंदर्भातल्या ज्या फाईल्स ईडी आणि सीबीआयने बंद केल्या आहेत, त्या उघडल्यानंतर राणे कुठे असतील? तर तिहार जेलमध्ये, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

मुंबई : नारायण राणे यांना तिहार तुरुंगात जावं लागेल, असं विधान संजय राऊत यांनी केलंय. दोन महिन्यात आमचं सरकार येईल राणेंच्या जुन्या फाईल्सची चौकशी पुन्हा सुरु होईल, असा दावाही राऊतांनी यावेळी केला. ते पत्रकारांशी बोलत होते. 'नारायण राणे यांच्यासंदर्भातल्या ज्या फाईल्स ईडी आणि सीबीआयने बंद केल्या आहेत, त्या उघडल्यानंतर राणे कुठे असतील? तर तिहार जेलमध्ये, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान, राऊतांच्या विधानावर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी पलटवारही केलाय. मुंगेरीलाल के हसीन सपने, म्हणत नितेश राणे यांनी राऊतांच्या दाव्यावर प्रत्युत्तर दिलंय. २०२४ला लोकसभेला एनडीएचं सरकार येणार आहे, असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त करताना नितेश राणे यांनी नेमकं काय म्हटलं, त्याचा आढावा आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com