Sanjay Raut: राज ठाकरेंनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली, मराठी आंदोलनावर यू टर्न घेतल्यानंतर संजय राऊतांचा टोला, VIDEO

Raj Thackeray: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहे, यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करत राज ठाकरेना टोला लगावला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळ्यात बोलताना पुन्हा एकदा मराठी भाषेचे मुद्द्याला हात घालत बँका आणि इतर आस्थापनांमध्ये जाऊन तपासा मराठी भाषेचा वापर होतो आहे की नाही असे आदेश राज ठाकरेंनी आपले कार्यकर्त्यांनी दिले होते. दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरून बँकेमध्ये मारहाणीची घटना देखील घडली होती. तसेच मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहून हे आंदोलन आता थांबवायला हरकत नाही अशी सूचना दिली. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, त्यांनी त्यांच्या राजकारणाची परंपरा पाळली त्यांना शुभेच्छा आहेत परंपरा मी सांगायला पाहिजे का? मराठीचे आंदोलन म्हणणार नाही आम्हीपण आंदोलन केले आहेत. आम्ही पण लोकांच्या कानफटात मारली आहेत. बँका स्थापने राष्ट्रीय स्तरावर मराठी मूल्य यश मिळावी यासाठी क्लासेस चालविलेला आहेत. शिवसेना भवनात आम्ही मुलांची मानसिक तयारी केली आणि नंतर आम्ही आंदोलन केले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान पुढे बोलताना, संजय राऊत म्हणाले की, आम्ही कुणाच्या कानफाटात मारली तर ती एअर इंडियाच्या चेअरमनच्या. वॉचमनला नाही मारले. प्रमुखांच्या कानाखाली मारले पाहिजे. वॉचमनला मारून नाही होत. फडणवीस यांच्या कृपेने आंदोलन होत आहे त्यांनी कधी आंदोलन केले आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com