मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. कामाख्य देवीला रेडे कापले त्याची शिंगं लॉनमध्ये खोदकाम करून पुरली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केला आहे. तर जर ही शिंगं गाडली असली तर ती बाहेर काढा असं आवाहन छगन भुजबळ यांनी राऊतांच्या दाव्यावर केलं आहे.
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्य देवीवरून आलेल्या रेड्याची शिंगं पुरलेली आहेत. अशा चर्चा आहेत, की कामाख्य देवीला काही रेडे कापले गेले. त्यांची मंतरलेली शिंगं आणलेली आहेत आणि ती तिथे पुरलेली आहेत. मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये, आमच्याकडेच राहावं अशी धारणा आहे, हे सगळं बंगल्यातले काम करणारे काही कर्मचारीच सांगत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जर ही शिंगं कोणी गडलेली आहेत, तर त्यांनी जाऊन ती काढावी बाहेर, असं आवाहन नेते छगन भुजबळ यांनी यावर केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.