Sanjay Raut : सिनेट निवडणूकीवर संजय राऊतांच मोठं विधान; विडियो

Mumbai University : मुंबई विद्यापीठाची दोन दिवसांवर आलेली सिनेट निवडणूक पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केल्याने राऊतांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

सिनेट निवडणूक दोन दिवसांवर आली होती आणि त्याची तयारीही झाली होती. शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्ते सर्वच्या सर्व जागा जिंकणार ही बातमी येतात शिंदे सरकार घाबरले आणि निवडणूकच रद्द केली. नरेंद्र मोदी लोकशाहीवर मोठी-मोठी भाषणे करतात. यात निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सरकारच्या बोळ्याने दूध पितायत का? असा सवाल राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, केंद्रातील कुबड्यांचे सरकार 'एक देश एक निवडणूक' या योजनेचे ढोल वाजवत आहे, पण सिनेटची निवडणूक, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही.

जिथे पैशांची ताकद तिथेच सत्ताधारी निवडणुका लढवतात, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. मुंबई विद्यापीठाची दोन दिवसांवर आलेली सिनेट निवडणूक पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याने राऊतांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com