Video: सांगलीची जागा ठाकरे गट काँग्रेसला देईल का? विशाल पाटील पत्रकार परिषेदत महत्त्वाचं बोलले!

Vishal Patil Sangli News Today: सांगलीतून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगली : सांगलीत (Sangli News) महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे की काय? अशी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस आमदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी काँग्रेस सांगलीच्या जागेसाठी आग्रही असल्याचं पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उद्देशूनही त्यांनी महत्त्वाची वक्तव्य केली. दरम्यान, सांगली लोकसभेच्या उमेदवाराबाबत सकारात्मक निर्णय लवकरच होईल, अशा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांगलीतून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर संजय राऊत हेही सांगलीत जाणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, आता काँग्रेस आमदार विशाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस आग्रही असल्याचं पुन्हा एकदा ठळकपणे नमूद केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com