Maharashtra Politics: आधी धस- मुंडे भेट, आज क्षीरसागरांची अजित पवारांसोबत चर्चा; बीडमध्ये नेमक काय घडतंय ?

Sandip Kshirsagar and Ajit Pawar's secret discussion: शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत सुमारे अर्धातास चर्चा केली.

आज किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावर जुन्नर बाजार समितीच्या कार्यालयातील बंद खोलीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात सुमारे अर्धातास चर्चा झाली. यावेळी अजित पवारांनी संदीप क्षीरसागर यांच्या समोरच दोन फोन लावले अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच वाल्मीक कराडने बीडमध्ये माजवलेली दहशत याला मंत्री धनंजय मुंडे कारणीभूत आहे असा आरोप शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. त्यामुळे मुंडेच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करणारे संदीप क्षीरसागर यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. तर दोन दिवसापूर्वी आमदार सुरेश धस यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत जाऊन धनंजय मुंडेंची भेट घेत तब्बल साडे चार तास चर्चा केली. यामुळेच बीडच्या नेत्यांची देशमुख हत्या प्रकरणावरून भूमिका बदलत चालली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com