Sambhajinagar : आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक; संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या | VIDEO

Aadarsh Patsanstha News : दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतरही छत्रपती संभाजीनगरचे प्रशासन काहीही कारवाई करीत नसल्याचा निषेध करीत आंदोलक जिल्हाधिकारी दालनात पोहोचले असून याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आदर्श पतसंस्थेमध्ये अडकलेले ठेवीदारांचे पैसे मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून माजी खासदार इम्तियाज जलील हे आंदोलन करीत आहेत. आजही ते आंदोलन स्थळी येऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आदर्श पतसंस्थेच्या मालमत्तेची लिलावाव्दारे विक्री करून ठेवीदारांना रक्कम परत करण्याबाबत प्रशासनाने केवळ घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे अखेर आजपासून सर्व ठेवीदार आमरण उपोषणाला बसले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील हजारो ठेवीदार आदर्श पतसंस्थेमध्ये आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र आदर्श घोटाळा झाल्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळू शकले नाहीत. १६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान देवीदारांच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदर्शची सहका मालमत्ता जप्त करुन गोरगरीब ठेवीदारांची रक्कम परत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळू शकले नसल्यामुळे अखेर आंदोलनाची वेळ या ठेवीदारांवर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com