Pune News: ‘सैराट’ ची पुनरावृत्ती; बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला|VIDEO

Maval Horror: पुणे येथील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, यामुळे मावळ तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पुणे: सैराट चित्रपटात जसा पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला होतो, तशीच घटना मावळच्या सांगवी येथे घडली आहे. बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून तिघांनी एका युवकावर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 5 एप्रिल रोजी सांगवी गावच्या हद्दीत वडगाव मावळ सांगवी रस्त्यालगत असलेल्या अनुष्का हॉटेलजवळ घडली.

संकेत तोडकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून शिवराज बंडू जाधव, यश अजय जाधव, आणि विशाल पाथरवट असे आरोपींचे नावे आहे. या प्रकरणातील दोन आरोपी यश जाधव आणि विशाल पाथरवट यांना वडगाव पोलिसांनी मोठ्या कसरतीने अटक केली आहे. वडगाव मावळ न्यायालयाने या दोघांना आठ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तर शिवराज जाधव अद्यापही फरार आहे या प्रकरणाचा अधिकचा तपास मावळ पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com