VIDEO: Nanded जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Nanded Rain News: नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची हजेरी, पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित.

नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालेलं पाहायला मिळालं. धबधबा प्रवाहित झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे तयार झालेला हा सुंदर नजारा डोळ्यात साठवण्याची पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. रविवारी सुट्टी असल्या कारणाने सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com