Russian Population crisis : मूल जन्माला घाला, 80 हजार मिळवा; कॉलेज विद्यार्थिनींना अजब ऑफर, पाहा स्पेशल रिपोर्ट

russian maternity scheme details : कॉलेजच्या मुलींना मूल जन्माला घालण्यासाठी सरकार 80 हजार रुपये भत्ता देतंय यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.. पण ही घटना खरी आहे.. नेमकं कुठलं सरकार कॉलेच्या विद्यार्थिनींना मूल जन्माला घालण्यासाठी 80 हजार रुपये भत्ता देणार आहे? त्यासाठी अटी काय आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

भारत लोकसंख्या वाढीने हैराण आहे.. देशाची लोकसंख्या 135 कोटींच्या वर गेलीय... तर दुसरीकडे रशिया, चीन, जपान, उत्तर कोरिया घटत्या जन्मदरामुळे संकटात सापडलाय.. रशिया सरकारने तर मूल जन्माला घालण्यासाठी 25 वर्षांच्या आतील कॉलेजच्या विद्यार्थिनींना चक्क 1 लाख रुबल म्हणजेच 81 हजार रुपयांचा भत्ता देण्याचा निर्णय... रशिया सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे पाहूयात.

25 वर्षाखालील कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सुदृढ बालक जन्माला घातल्यास 1 लाख रुबलचा भत्ता

विद्यार्थिनी कॉलेजची पूर्णवेळ विद्यार्थिनी असणं आवश्यक

नवजात बालकाच्या पालन पोषणासाठी सरकार आर्थिक सहाय्यता देणार

1 जानेवारीपासून योजनेचा लाभ मिळणार

जन्मलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यास लाभ मिळणार नाही

2024 च्या पहिल्या 6 महिन्यात रशियात अवघ्या 5 लाख 99 हजार 600 बालकांचा जन्म

मुलांचा जन्मदर गेल्या वर्षीपेक्षा 16 हजारने कमी

रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक युवकांचा मृत्यू

रशियाच्या कारलियाच्या प्रशासनाकडून निर्णय

1990 नंतर पहिल्यांदाच रशियातील जन्मदरात कमालिची घट झालीय.. दुसरीकडे रशियात वृद्धांची संख्या वाढत आहे...त्यामुळे रशियन सरकारने गर्भपातविरोधी कायदे कठोर करत मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केलीय.. आता सरकारने प्रोत्साहन दिल्यानंतरही कॉलेज विद्यार्थिनी काय भूमिका घेणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com