Video: मालवणमधील राड्यावर रुपाली चाकणकर यांची मोठी प्रतिक्रिया

सुरुवातीच्या काळात विरोधक टीका करत होते ही योजना निवडणुकीचा जुमला आहे. प्रत्यक्ष सव्वा कोटी माता भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले तेव्हा विरोधकांची तोंडे बंद झाली.

"छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. जी घटना घडली ती प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायक आहे. अजितदादांनी 13 कोटी जनतेची माफी मागितली आहे. विरोधकांकडे चांगलं काही सांगावं असं काहीच नाही आहे. त्यांच्या विचाराची सुद्धा आम्हाला कीव वाटते. हा राजकारणाचा विषय नाही यामध्ये राजकारण करू नये", असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात. "अजितदादांनी जो अर्थसंकल्प मांडला, शेतकरी कामगार कष्टकरी व मातृ शक्तीला भरभरून दिलं, त्यामुळे महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद त्यांना मिळतोय. सुरुवातीच्या काळात विरोधक टीका करत होते ही योजना निवडणुकीचा जुमला आहे. प्रत्यक्ष सव्वा कोटी माता भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले तेव्हा विरोधकांची तोंडे बंद झाली. महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जातोय", असंही रुपाली चाकणकर म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com