VIDEO: रणमशीन Virat Kohli ची झुंझार खेळी, ऑफ्रिकेलाही हादरून सोडलं

Virat Kohli ICC T20 World Cup: टी-२० वर्ल्डकपला सुरूवात झाल्यानंतर विराटला प्रत्येक सामन्यात अपयश, फायनलमध्ये विराट कोहलीची उत्कृष्ट कामगिरी

टी-२० वर्ल्डकपला सुरूवात झाल्यानंतर विराटला प्रत्येक सामन्यात अपयश मिळालं. अगदी आयपीएलमध्ये फोर, सिक्स आणि सेन्चुरी लगावणाऱ्या विराटची रणमशीन इथं डाऊन झाली होती. त्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. पण तो जराही डगमगला नाही, विचलित झाला नाही, त्याने स्वत:वर विश्वास ठेवत ट्रोलर्सला करारा जवाब दिला आणि तो खरचं मोठ्या मॅचचा प्लेअर आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं.. ते कसं? हेच या व्हिडिओतून पाहुयात..

टॉस जिंकल्यानंतर, रोहितनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.. यावेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा ओपनिंगसाठी मैदानात उतरला. पण यावेळी विराट एका वेगळयाच अंदाजात दिसला, कारण गेल्या मॅचमध्ये त्यानं कधीही न केलेली गोष्ट या मॅचमध्ये केली. ती म्हणजे ग्राऊंडवर उतरल्यानंतर त्याने इथं-तिथं पाहिलं आणि बॅट हातात धरून खाली बसला. याचक्षणी तो काहीतरी पुटपुटला, बहुतेक त्याने मागील सर्व मॅचेसमध्ये केलेली खराब कामगिरी डोळ्यांसमोर आणली असावी...स्वत:ला विश्वासात घेतलं असावं... या ट्रॉफिसाठी त्यानं आपला जीव पणाला लावला होता.. कारण तो यावेळी नॅचरली खेळत होता. जणू की,हार्ड हिट.

विराटला जेवढ्याही सामन्यात अपयश मिळालं. त्यासाठी त्यानं अपयशाविरोधात खेळण्याचा प्रयत्न केला... त्यामुळे त्याला हाफ सेन्चुरी ठोकता आली आणि मॅच विजयाच्या दिशेनं खेचता आली. त्याचं झालं असं की, विराट हा नव्या जोशात मैदानात उतरला. विराट आणि रोहितनं हिट मारण्यास सुरूवात केली. पण रोहितला ९ बॉलात ५ चं धावा काढता आल्या. आणि पहिल्याच फटक्यात रोहित बाहेर गेला. भारताला पहिला झटका बसल्यानंतर, सर्वात सिनियर प्लेअर म्हणून संपूर्ण टीमची जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. त्यामुळे मनात जराही भिती न बाळगता त्याने ती जबाबदारी पेलली. रोहितनंतर ऋषभ पंत मैदानात आला. पण तो झिरोवर आऊट झाला.. तिसऱ्या नंबरवर सूर्यकुमार यादव आला पण त्याला ३ धावांवर समाधान मानावे लागले. कारण फायनल मॅचमध्ये सूर्याची बॅट तळपली नाही. यानंतर अक्षर पटेलने विराटला चांगली साथ दिली. अक्षरने उत्तम कामगिरी करत ४७ धावा काढल्या. अक्षरनंतर शिवम दुबेने २७ धावा केल्या. असं करत करत टीम इंडियाने १०० पेक्षा अधिक धावा पूर्ण केल्या. आता विराटची हाफ सेन्चुरी झाली होती. जसं जसे ओव्हर संपत होते.. त्यानंतर त्याने हार्ड हिट करण्यास सुरूवात केली. पण दुर्देवाने जॅनसनच्या बॉलवर कोहलीने हिट मारला खरा, पण रबाडाने कोहलीची कॅच पकडली आणि सामना आफ्रिकेच्या हातात जाणार असंच वाटू लागलं. कोहलीने ५९ बॉलमध्ये ७६ धावा काढल्या. यामध्ये ६ चौके, २ छक्के आणि १२९चा स्ट्राईक रेटने तो खेळला... अगदी १९ व्या ओव्हरपर्यंत त्याने झुंज दिली. पण सेन्चुरीसाठी तो मुकला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कोहलीने टी-२० इंटरनॅशनमधून निवृत्तीची घोषणा केलीये. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण विराटच्या या कामगिरीनं ट्रोलर्सला दाखवून दिलं की, शेर कितना भी बूढ़ा हो जाये लेकिन शिकार करना नहीं भूलता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com